या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा शलमोन आणि ईयोब यांच्याप्रमाणे एकेकाळी स्वर्गाच्या राज्यात राहणारा देवदूत होता. आपल्याला शिकवले जाते की, या पृथ्वीवरील जीवन कष्टांनी आणि दु:खाने भरलेले आहे, कारण स्वर्गात परमेश्वराबरोबर गौरवात राहणाऱ्या देवदूतांनी मरणाकडे नेणारे मोठे पाप केल्यानंतर त्यांना येथे हाकलून देण्यात आले होते.
हरवलेले नवीन कराराचे वल्हांडण आज पुन्हा स्थापित करणारे दुसरे कोणी नसून आपले परमेश्वरच आहेत. कारण संपूर्ण मानवजातीने स्वर्गात केलेल्या आणि मरणाकडे नेणाऱ्या पापांची क्षमा प्राप्त करून स्वर्गाच्या राज्यात परत जावे म्हणून येशूंनी वधस्तंभावरील आपल्या बलिदानाद्वारे जो करार स्थापित केला, तोच नवीन कराराचे वल्हांडण आहे.
त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे. इफिसकरांस पत्र १:७
कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरांस पत्र ६:२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण