जेव्हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडला, तेव्हा परमेश्वराने प्रथम वल्हांडणाचे सामर्थ्य प्रगट केले,
आणि मोशेच्या नियमाद्वारे वल्हांडणाची घोषणा केली, त्यांना नियुक्त वेळेवर येणार्या पिढ्यांसाठी पाळण्याची आज्ञा दिली.
नंतर, वल्हांडण पाळल्यानंतर परमेश्वराच्या लोकांची स्तुती करण्यात आली आणि नाशापासून त्यांचे संरक्षण करण्यात आले,
आणि येशूने देखील आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण पाळला, ज्याद्वारे त्यांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला.
इ.स ३२५ मध्ये वल्हांडण रद्द करण्यात आला तेव्हापासून, सर्व चर्च मूर्तिपूजक देवताच्या प्रथा पाळत आहेत.
मात्र, चर्च ऑफ गॉड सदस्यांना वल्हांडणाच्या महत्त्वाची जाणीव करते,
ज्याची परमेश्वराने आपल्या लोकांना ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणींद्वारे
पुढील पिढ्यांपर्यंत पाळण्याची आणि त्याचे पालन करण्याची आज्ञा दिली.
नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे
त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.”
मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या सर्व मनाने, आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व बलाने
परमेश्वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही.
२ राजे २३:२१–२५
त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की,
‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.’ ”
मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
मत्तय २६:१८–१९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण